Buy Gold
Sell Gold
Daily Savings
Round-Off
Digital Gold
Instant Loan
Credit Score
Nek Jewellery
आर्थिक स्वातंत्र्य सर्वांनाच हवे असते पण फार कमी लोकांना ते खरोखर मिळते. असे का? याचे कारण हेच आहे की जे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात तेच आर्थिकदृष्ट्या साक्षर असतात.
एखाद्या वेळी लॅपटॉप किंवा फोन दुरूस्तीचा अनपेक्षित खर्च आला की पोटात गोळा येण्याचा अनुभव आपण सर्वांनाच कधीतरी आलेला आहे. हो ना? आता हे पैसे कुठून द्यायचे ही चिंता आपल्याला सतावते.
महागड्या लॅपटॉपची किंवा फोनची दुरुस्ती तुमच्यासाठी कमी त्रासदायक गोष्ट असली तर? चिंता करण्याऐवजी तुम्ही तडक ते बिल देऊन टाकाल आणि आठवड्याभरातच त्याबद्दल सारे काही विसरुनही जाल! तुमच्या एकूण आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम इतका नगण्य असतो की ती काही आणीबाणी बनत नाही तर एक सामान्य घटना होऊन जाते.
हेच तर आहे आर्थिक स्वातंत्र्य.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर अशी आर्थिक स्थिती ज्यात तुमच्याकडे तुमचा खर्च चालवण्यासाठी पुरेसे पैसे असतात. तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करण्याची किंवा एखादा सक्रिय उत्पन्नाचा स्रोत असण्याची जरूर नाही.
अनपेक्षित घटनांच्या आर्थिक परिणामांची तुम्हाला फार चिंता करावी लागत नाही कारण तुम्ही त्यासाठी सक्षम असता.
जेव्हा तुम्ही पैशांसाठी काम करता तेव्हा तुम्हाला मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला तासाच्या हिशोबाने तुमच्याकडच्या पुंजीवर मिळतात तेव्हाच हे शक्य होते!
तुम्ही तुमचे निर्णय कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय घेऊ शकता आणि तुमचे पैसे तुमच्याविरूद्ध नाही तर तुमच्या बाजूने काम करतात. आपण सगळेच हे स्वप्न पाहतो, नाही का ?
एकदा का तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले की तुम्ही तुमच्या छंदांना वेळ देऊ शकता – संगीत, खेळ, कला, जगप्रवास इत्यादी.
याचा अर्थ गडगंज श्रीमंती असणे आणि ऐषोआरामाचे जीवन जगणे असा नाही तर पुरेसे पैसे असणे असा आहे.
पण हे सगळं जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या साक्षर असलात तरच साध्य होऊ शकतं. मात्र आपल्या देशात ही एक समस्याच आहे.
चांगले आर्थिक व्यवस्थापन आपली जीवनशैलीच बदलू शकते आणि आपले भविष्य किती सुरक्षित असेल हेही निश्चित करू शकते. पण बहुतेक लोकांना त्याची कल्पना नसते.
नॅशनल सेंटर फोर फायनान्शिअल एज्युकेशन (National Centre for Financial Education) ने 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार 80% भारतीय साक्षर आहेत पण त्यातले फक्त 27% आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत.
एखादी व्यक्ति कमवायला लागते आणि बचत करणे सुरू करते त्यामध्ये सरासरी 10 वर्षांचे अंतर असते. हा आकडा फार धक्कादायक आहे!
आयुष्यातले निर्णय त्यांच्या आर्थिक परिणामांची अति चिंता न करता घेणे कसे शक्य आहे हे प्रत्येकाला माहिती असायला हवे.
आर्थिकृष्ट्या साक्षर व्हा आणि पैशांनी तुम्हाला मुठीत ठेवण्याऐवजी तुम्ही पैशांना मुठीत ठेऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवा.
सध्या कोव्हिड-19 महामारीने संपूर्ण जगातील लाखो लोकांना ग्रासले आहे आणि असंख्य लोकांना आर्थिक संकटाच्या गर्तेत ढकलले आहे.
आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे तयार असणे हा या परिस्थितीने शिकवलेला एक महत्त्वाचा धडा आहे हे नक्की.
पण आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की आहे तरी काय?
अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर आर्थिक साक्षरता म्हणजे आपली संसाधने आणि उत्पन्न यांचे व्यवस्थापन करण्यासाठी माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता.
मुळात ती एक पक्के आर्थिक धोरण आखू शकण्याची क्षमता आहे, असे म्हणायला हारक्त नाही. हे आयुष्याचे एक मूलभूत कौशल्य आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या आनंदावर होतो.
त्यामुळेच शाळा, कॉलेजांमध्ये हे शिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच योग्य आर्थिक निर्णय घ्यायला शिकू.
लहान वयातच वैयक्तिक आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाची आर्थिक कौशल्ये शिकणे जसे की आर्थिक अंदाजपत्रक बनवणे, नियमित बचत करणे, गुंतवणूक करणे आणि विचारपूर्वक खर्च करणे; यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात ती अंमलात आणण्याच्या अनेक शक्यता उभ्या राहतात.
जर आपण स्वतः एक चांगले आर्थिक धोरण पाळू शकत नसलो तर त्यातील तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
इथेच फायनान्शिअल प्लॅनर आणि फायनान्शिअल प्लॅनिंग वेबसाईट्स उपयोगी ठरतात. इंटरनेटच्या कृपेने आज आपल्याला हवी ती सर्व माहिती लगेच मिळू शकते.
गुगलवर एक साधासा शोध तुम्हाला आर्थिक नियोजनाचे आवश्यक घटक, त्याची मूलभूत तत्त्वे यांबद्दल आणि त्याचबरोबर हजारो फायनान्शियल प्लॅनर्सशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक अशी भरपूर माहिती देईल.
आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास सुरू करताना काही महत्त्वाच्या सवयी लावून घ्यायला हव्यात. त्या सवयींची यादी पुढे दिली आहे.
तुमच्यावर कर्ज असेल तर व्याजाच्या दरामुळे तुमची देय रक्कम तुम्ही फेडू शकाल त्यापेक्षा वेगाने वाढू शकते.
यामुळे नियंत्रण करणे कठीण होऊन पैशाबरोबरचे तुमचे संबंध जास्तच अवघड बनू शकतात.
आयुष्य कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करून तुम्ही तुमची शक्ती परत मिळवून आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू शकता.
पैशांसाठी काही निश्चित योजना केल्याशिवाय काही तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आम्हाला माहिती आहे की हे थोडंसं कठीण जाईल. पण या महिन्याचा पगार ते पुढच्या महिन्याचा पगार अशा अर्थचक्राच्या चिंतेत जगणे सोडा.
आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीसाठी एक निधी तयार करा.
अशा आणीबाणीसाठीच्या निधीमुळे आयुष्यात अचानक येणाऱ्या संकटांशी तुम्ही सामना करू शकता.
एकदा का तुम्ही कर्जमुक्त झाला आणि आणीबाणीच्या निधीसाठी बचत सुरू केलीत की तुमच्या दैनंदिन खर्चापलिकडे जाऊन निवृत्ती, मुलांचे शिक्षण, गहाणखत, फिरायला जाणे वगैरेसाठीही बचत सुरू करा.
यासाठी थोडा विचार करावा लागेल. पण वेळ काढून तुमची आवक कशा प्रकारे विभाजित करावी याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे.
तुमचे खर्च भागवून बचतीचे उद्दिष्ट कसे साध्य करावे याचा विचारच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल.
गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही तुम्ही जाणून घेतले पाहिजे.
पहिली पायरी आहे योग्य आर्थिक निर्णय घेणे. पण आपल्या पैशांच्या व्यवस्थापनाविषयी कटिबद्ध असणे आणि कायम तसेच राहणे कठीण आहे.
तुमची आर्थिक उद्दिष्टे अधिक उन्नत करण्यासाठी, आर्थिक स्थिरता मिळवण्याची सर्वोत्तम संधी मिळवण्यासाठी तुम्हाला इथेच परत यावे लागेल. .
तुमची गुंतवणूक ऑटोपायलट पद्धतीने करण्याने काही विशेष साध्य होणार नाही. तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार वारंवार तपासून, त्याचे बारकाईने विश्लेषण करायला हवे. म्हणजे बदलत्या काळानुसार तुम्हाला कोणते बदल करणे आवश्यक आहे ते तुमच्या लक्षात येईल.
प्रत्येकाचे आर्थिक स्वातंत्र्य वेगळे असते. तुमच्या परिस्थितीनुसार त्याला वेळ लागू शकतो. त्यासाठी फक्त उद्दिष्टे ठरवणे आणि खर्चावर लगाम घालणे एवढेच नाही तर पैशांबरोबर एक सुदृढ नाते बनवणे अभिप्रेत आहे..
पण एकदा का हे तुम्हाला जमले की तुमचे भविष्य सुरक्षित आहे ही खात्री असल्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे ते करू शकाल.
तुम्हाला हे माहिती आहे का की सुरुवात करायला एक लहानसे पाऊलही पुरेसे आहे? जार ॲप या ऑटोमेटेड दैनंदिन बचत ॲपद्वारे तुम्ही गुंतवणूकीचा प्रारंभ करु शकता आणि त्यासाठी तुमच्या खिशाला फारसा भुर्दंडसुद्धा बसणार नाही.
तुमचे पैसे त्यांच्या लघु गुंतवणूक प्लॅनद्वारे ऑटोमॅटिकली डिजिटल गोल्डमध्ये गुंतवले जातील. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये हे अत्यावश्यक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे..
जार ॲप कसे काम करते याबद्दल अधिक माहिती वाचा. ते तुमचे पैसे कसे वाचवते आणि त्याचवेळी ते डिजिटल गोल्डमध्ये कसे गुंतवते हे समजून घ्या. या पद्धतीमुळे तुम्ही फक्त आर्थिक बचत करत नाही तर आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल टाकता.